Type Here to Get Search Results !

जामनेरात पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


जामनेर :-:-  तालुक्यातील पहुर  व तोंडापूर येथे शिवसेना युवा सेना शाखेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय भावी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या 65 वा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

पहूर येथे शहर कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक राहुल चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश पांढरे उप तालुकाप्रमुख अशोक जाधव विभाग प्रमुख दगडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हा संघटक पत्रकार गणेश पांढरे ज्येष्ठ शिवसैनिक खंडू काका लहासे आदींनी शिवसेना पक्षाचा खडतर प्रवास जामनेर तालुक्यातील शिवसैनिकांचा सांगितला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य संघटक राहुल चव्हाण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांना संकल्प करण्याचे शपथ दिली आगामी 2024 विधानसभेत महाराष्ट्र राज्यावर भगवा फडकलाच पाहिजे उद्योग साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेकांनी जामनेर तालुक्यात भगवा फडकवा यासाठी प्रयत्न करावे असे याप्रसंगी बोलताना केले

यावेळी शहर प्रमुख संजय तायडे शहर प्रमुख सुभाष पाटील युवा सेना शहर प्रमुख शुभम बारी विनोद ठाकूर शांताराम ठाकूर विनोद पाटील विनोद रामचंद्र पाटील सुनील पाटील रायदास गोंदनखेडे शांताराम गोंधनखेडे अशोक वारुळे विभाग प्रमुख दगडू पाटील ज्येष्ठ शिवसैनिक खंडू लहासे उपशहर प्रमुख युवा सेना शुभम घोलप सतीश बारी अल्पसंख्या आघाडी प्रमुख पप्पू शेख बाबा पिंजारी माजी गटप्रमुख अजय जाधव सचिन भोई गौतम मोरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

                 संगमेश्वर महादेव मंदिरात महाआरती

येथील संगमेश्वर महादेव मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्य लाभो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाआरती आयोजन करण्यात आले होते

शिवसेना उपजिल्हा संघटक तथा पत्रकार गणेश पांढरे सह पत्नीसह संघेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments