दिशा लाईव्ह न्यूज -:- गेल्या आठवड्यापासून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होतांना दिसून येत होती,मात्र काल 14 रोजी तेलाच्या किमतीत अचानक दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
भारत सरकारने क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क वाढवून अनुक्रमे २०% आणि ३२.५% करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केले की क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क शून्य वरून २०% पर्यंत वाढवले आहे. याव्यतिरिक्त, रिफाइंड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांवरील मूलभूत सीमा शुल्क १२.५% वरून ३२.५% करण्यात आले आहे. शासनाने सीमा शुल्क वाढविल्याने तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments