शंकर भामेरे,पहूर, ता.जामनेर ( ता . २१ )
पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.
साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्याबाई होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
साखळी उपोषणाच्या या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणस्थळी माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, शिवसेनेचे नेते गणेश पांढरे, धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, समाधान पाटील, ॲड एस आर पाटील, शैलेश पाटील ज्ञानेश्वर करवंदे, अरुण घोलप, किरण पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाम सावळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, अरविंद देशमुख, संजय तायडे, विनोद पाटील ,सुनील पाटील, अमोल पाटील, अशोक पंढरी पाटील ,बंडू अशोक पाटील, विनोद पाटील, शांताराम गोंधणखेडे, भाऊराव गोंधनखेडे, सुकलाल बारी, अशोक देशमुख ,पंडित सर, शरद पांढरे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027




.jpg)
Post a Comment
0 Comments