कुऱ्हाड प्रतिनिधी ---सुनील लोहार.
पोलिस आणि अध्यात्म ही व्याख्या कदापि जुळून येत नसली तरी बरेचसे खाकीवर्दीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लहापणापासून अध्यात्म क्षेत्राची आवड आहे.त्याला अपवाद पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा दूरक्षेत्र पोलीस ला सहाय्यक फौजदार या पदावर नियुक्त असलेले ह.भ.प.निवृत्ती मोरे हे आपली खाकी वर्दीची ड्युटी सांभाळून मिळेल त्या वेळेतून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती तसेच समाजप्रबोधन करीत आहेत. लहानपणापासूनच त्यांना भक्ती मार्गाची आवड असल्याने ते घोटी जिल्हा नाशिक येथील संत श्रीपाद बाबा यांचे शिष्य आहेत. दिवसभर पोलीस खात्याचे कर्तव्य बजावून नंतर मिळेल त्या वेळेत प्रत्येक गाव-गावी जाऊन कीर्तन सेवा देत असतात .
सध्या गणपती उत्सव सुरू असल्याने असाच त्यांचा एक कार्यक्रम नगरदेवळा येथील छत्रपती संभाजी महाराज नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ तर्फे , एक गाव एक गणपती उत्सव तर्फे सहाय्यक फौजदार ह.भ.प.निवृत्ती मोरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार 13 तारखेला रात्री आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाला नगरदेवला गावातील सर्व भाविक भक्तांची गर्दी होती.तसेच पीएसआय योगेश गणगे यांनी त्यांच्या या सामाजिक व अध्यात्मिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार व नगरदेवळा पोलीस स्टॉप मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील, दिनेश पाटील, सचिन पाटील व कमलेश राजपूत या सर्वांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला.

Post a Comment
0 Comments