दिशा लाईव्ह न्यूज -:- वावडदे ता जळगाव दि १५ रोजी दूपारी ३.३० वाजता एरंडोल ते शेगाव दिंडीचे स्वागत करण्यात आले दिंडीचे हे ३५ वे वर्ष आहे यावेळी ४०० भाविक दिंडीत होते वावडदे येथील सामाजिक कार्यकर्ते व खानदेश वधुवर ग्रुप व गौरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बापुरसाहेब सुमित पाटील यांनी आरती केली.
यावेळी महाप्रसादचा कार्यक्रम जि.प सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्याकडुन होता या दिंडीचे आयोजन शामकांत मोरे (एरंडोल) यांनी केले यावेळी जानकीराम पाटील. प्रमोद पाटील. रविंद्र येवले.गणेश गोपाळ.गबलु पाटील .माणिक न्हायदे. मिलिंद धनगर. बापू न्हावी.नाना जाधव. दिलीप पाटील. मधुकर पाटील.अजय गोपाळ.पिटु मराठे. दिनेश सोनवणे मोहाडी.या सह वावडदे सह परीसरात ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments