दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरेसर,पहूर ---:::--- दि . 31 डिसेबंर
नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणास महत्त्व देण्यात आले आहे. बंद वर्ग खोल्यांमधील शिक्षण आणि घोकंपट्टी यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान व निरिक्षणातून विविध घटकांची ओळख व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून पहूर येथिल महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फूले माध्यमिक विद्यालय येथिल क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत यांनी क्षेत्रभेटीचे नियोजन केले.
या क्षेत्र भेटीत विद्यालयाच्या इ ५ वी ते ७वी च्या १५० विद्यार्थ्यानी पहूर कसबे ग्राम पंचायत , ग्रामीण रुग्णालय व पहूर पोलिस ठाणे इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संबधित कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली ग्रामपचांयत मध्ये सरपंच आशाताई जाधव ग्रामसेवक यांनी विद्यार्थ्यांना ग्रा. प बद्दल माहिती विषद केली तर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री पाटील डॉ मंजुषा पवार राष्ट्रीय किशोर कार्यक्रम समन्वयक डॉ वैशाली अहिरे ,ऋषिकेश भालेराव यांनी रुग्णालयाची माहिती व रुग्णालयात केले जाणारे विविध उपचार या संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
पहूर पोलीस ठाणे येथिल प्रत्यक्ष कामकाज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटी अंतर्गत जाणून घेतले, पहूर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भरत दाते पोलीस कर्मचारी दिपक सुरवाडे , सागर गायकवाड , हेमंत सोनवणे , विनोद पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन अंतर्गत काम काजा विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याचा उत्साह पाहून भरत दाते यांनी मुलाना चॉकलेट वाटप केले.
क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक कल्पना बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले . चंदेश सागर यांनी सुत्रसंचलन केले तर राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले संदिप बनसोडे यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
Post a Comment
0 Comments