Type Here to Get Search Results !

मा. पंतप्रधान आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.. मनमोहनसिंग यांचे नुकतेच निधन.

 



नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे रात्री 10.15 च्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.


त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार 92 वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसची उद्या शुक्रवारी बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात होते. पण मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर बेळगावातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments