दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील शाह दावल शहा बाबांच्या दर्गा समोर वर्दळीच्या ठिकाणी विजवीतरण कंपनीचा कुजलेल्या अवस्-थेत असलेला धोकेदायक पोल असून तो केव्हा कुणाचा जीव घेईन याचा भरवसा राहिलेला नाही.
ह्याच ठिकाणी येत्या १४ व १५ तारखेला दत्त पौर्णिमेला मोठी यात्रा असून यात्रेत येणाऱ्या भाविकांना पोल कोसळून धोका संभवतो!!
तरी महावितरणने कोणाचा जीव गमविण्याची वाट न पाहता तात्काळ पोल बदलवा,अशी मागणी लोहारा येथील नागरिकांनी केली आहे.
हा धोकेदायक पोल ज्याठिकाणी आहे त्याच्या जवळच बाजूला १०० मीटरवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे,तर त्याच्या समोर पश्चिमेला १०० फुटांवर शहादावल शहा बाबांचा दर्गा आहे. तसेच दक्षिणेकडे मराठी मुलींची शाळा आहे. पोल जवळच रोज सकाळी गोठाणाच्या गुरांसह पशुपालक थांबतात .पोल जवळूनच शिक्षक कॉलनी कडे रस्ता जातो . तसेच रोज संध्याकाळी तेथे शेतकरी भाजीपाला जमा करून तो मार्केटला पाठवतात.
अशा भर वर्दळीच्या ठिकाणी हा धोकादायक पोल आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे येत्या १४ डिसेंबर रोजी दत्त पौर्णिमे निमित्त येथे यात्रा भरणार आहे. त्यावेळी कुणाचाही धक्का लागून पोल कोसळून अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरीष्ठनी याकडे लक्ष देऊन सदर धोकादायक पोल तात्काळ बदलावण्यात यावा अशी मागणी यात्रोत्सव मंडळी कडूनही करण्यात येत आहे.
भविष्यात काही अनर्थ घटना घटना घडल्यास त्याला जबाबदार महावितरणचे पदाधिकारी जबाबदार असतील यात शंकाच नाही.
महावितरणचा भोंगळ कारभार सुरूच.
लोहारा आणि परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दररोज विद्युत पुरवठा बंद होतो की करण्यात येतो? असा प्रश्न नियमितपणे वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना पडला आहे.
विशेष म्हणजे सकाळी जवळपास ४ वाजेपासून गेलेली लाईन केव्हा येईल भरोसा नाही. कधी सकाळी १०ला तर ११ ला ही येते.त्यामुळे नियमितपणे वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
सध्या शेतीचे काम चालू आहे.
बऱ्याच वेळा शेतकरी रात्री शेतात रात्री 1 वाजेला जातो आणि ४ वाजता लाईन जाते. तीन तासांत तो शेतकरी काय करणार?
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित मरगळ झटकून तात्काळ वीजचोरी थांबवायला हवी, तेव्हाच वीजपुरवठा सुरळीत चालू राहील.
सध्या लोहारा आणि परिसरात वीजचोरी मोठ्या प्रमाणात चालू आहे. यांचा बंदोबस्त कोण करेल? असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिक करीत आहे.म्हणजेच चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे.
संबंधित अधिकारी यांनी या वीजचोरीचा प्रश्न थांबवायला हवा-तेव्हाच गावातील व परिसरातील वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीतपणे मिळेल.
Post a Comment
0 Comments