Type Here to Get Search Results !

पोखरा 2.0 या नवीन योजनेसंदर्भात तालुक्यातील सरपंचाचे प्रकल्प ओळख प्रशिक्षण संपन्न!! पाचोरा,भडगाव, व चाळीसगाव तालुक्यातील सरपंचांनी घेतला सहभाग


कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .

शासनातर्फे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प  अर्थात नवीन  पोखरा 2.0 प्रकल्पांतर्गत दिनांक 5 व 6 फेब्रुवारी रोजी उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा अंतर्गत पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील सरपंच लोकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 


शासनाच्या पोखरा 2.0 प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंचांचे प्रशिक्षण जैन हिल्स, जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. काल दिनांक 5 फेब्रुवारी उपविभागीय कृषी अधिकारी, पाचोरा श्री किशोर मांडगे, तंत्र अधिकारी श्री एस.व्ही.कराड व प्रकल्प सहाय्यक, पोखरा श्री अविनाश चंदिले यांनी प्रशिक्षणास भेट देऊन उपस्थित सरपंच महोदयांशी  चर्चा केली. यावेळी प्रशिक्षण सत्र समन्वयक श्रीमती कल्पना पाटील व उपविभागातील  56 पैकी 44 सन्माननीय सरपंच उपस्थित होते.

 सर्वांना या योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली .या दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या  समारोप प्रसंगी कुऱ्हाड तालुका पाचोरा येथील महिला सरपंच कविता प्रदीप  महाजन यानी आभार मानले.



Post a Comment

0 Comments