Type Here to Get Search Results !

अहो आश्चर्यम् . . . ! अस्तित्वातच नसलेल्या मंदिरात वर्षभरात येतात सव्वा लाख भाविक ! तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . जालिंदर सुपेकर यांचे प्रमाणपत्र . . . ! खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली फसवणूक ? दिशा लाईव्ह न्यूजचा पाठलाग न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार-- कारण 25 लाख वाचकांचा आमच्यावर विश्वास आहे.



दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे- पहूर , ता . जामनेर  ( ता . १० )  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे गावाच्या  प्रवेशद्वाराजवळ  अस्तित्वातच नसलेल्या जय सप्तशृंगी माता निवासिनी मंदिरात वर्षभरात सुमारे सव्वा लाख भाविक दर्शन घेत असल्याची खळबळजनक माहिती  समोर आली आहे .


जय सप्तशृंगी मा निवासिनी मंदिराचे बनावट दस्तऐवज तयार करून राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे ग्रामीण तीर्थ विकास योजनेअंतर्गत ' क 'वर्ग मिळवण्यासाठी  तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . जालिंदर सुपेकर यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ' दिशा लाईव्ह न्यूज 'च्या हाती आले असून  यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे .


विशेष म्हणजे या मंदिरात चैत्र पौर्णिमा , अश्विन नवरात्रीनिमित्त यात्रोत्सव भरविण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले असून  जिल्हा नियोजन मंडळाने सदर मंदिरास 'क ' वर्ग दर्जा प्रदान केला आहे .

गेल्या वर्षी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी  जय सप्तशृंगी माता निवासीनी मंदिर हरवल्याची तक्रार पहूर पोलीस ठाण्यात दाखल करून शंखनाद आंदोलन केले होते . 

       जय सप्तशृंगी मॉ निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी  संबंधित मंदिराविषयी ग्रामपंचायतीला खोटी माहिती सादर केल्याचे उघड झाले आहे . 

        आता २५ - १५ योजनेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर ४५ लाखांच्या भव्य सभा मंडपाचे काम सुरू आहे .


 या कामाबाबत विचारणा केली असता ट्रस्टच्या अध्यक्षांनी विठ्ठल मंदिराचे काम सुरू असल्याचा बनाव केला आहे . 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी संतप्त भाविकांनी केली आहे .

तसेच सदर कारवाईकडे संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बघूया संबंधित अधिकारी/पदाधिकारी काय लक्ष देतात!! की चुकीच्या लोकांना राजाश्रय देतात. 

तूर्त इतकेच........



Post a Comment

0 Comments