दिशा लाईव्ह न्यूज -:- शेंदूर्णी, ता.जामनेर येथून जवळ असलेल्या आदर्श गाव मेनगाव येथील ग्रामपंचायतीत लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुरेश नारायण पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन येथील युवा कवी व लेखक हरीभाऊ महाजन यांनी केले.
प्रथम स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचेपूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कवी हरि भाऊ महाजन तसेच नवोदित गायक पियुष पाटील यांना गाणे म्हणण्याची संधी या देण्यात आली.
मुंबईहून आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक सिंगरव मेणगाव येथील भूमिपुत्र पी गणेश (गणेश पाटील )यांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
पी. गणेश पुढे म्हणाले की. नवोदित गायकांपुढे लता मंगेशकर या खूप मोठा आदर्श आहे. असे ते म्हणाले.
शेंदुर्णीचे नगरसेवक श्रीकृष्ण चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कर्यक्रमाला उपस्थितांचे आभार येथील सरपंच शरीफ तडवी, उपसरपंच जगदीश धुमाळ यांनी मानले.
प्रास्ताविक युवा सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी केले. यावेळी स्टार न्यूजचे संपादक शेख हमीद, सुनील मेंढे, दीपक धुमाळ, ज्ञानेश्वर ढमाले, सुनील पाटील, प्रकाश धुमाळ, या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments