दिशा लाईव्ह न्यूज- आबा येवले,पाचोरा :-:-- पाचोरा येथे नुकतेच नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी आपल्या कामाचा धडाका लावला असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी योग्य पावले उचललेले असून शहरातून गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतलेले आहे.
शहरात शांतता व तालुक्यात शांतता राहावी यासाठी त्यांनी पोलीस पाटील तसेच शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना शांततेसाठी आवाहन केले असून पाचोरा शहर हे आपले सर्वांचे असून शहरासाठी शांतता करावी याकरिता व्यापारी वर्ग यांनी सुद्धा सहकार्य करावे तसेच पोलीस कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनला आलेल्या व्यक्तीला मान सन्मान द्यावे पोलिसांनी रात्रीची गस्ती घालून चोऱ्या घरफोड्या नियंत्रित आणण्यासाठी पेट्रोलिंग करावी तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी .
नागरिकांनी कोणाच्याही दहशतीला घाबरून आहे तसेच रात्री अकरानंतर कोणीही बाहेर फिरता कामा नये, कोणी बाहेर जाऊन आल्यास त्यांनी आपल्याजवळ रेल्वेचे तिकीट अथवा एसटीचे तिकीट किंवा अकरा नंतर सिनेमा पाहून आल्यास त्या टॉकीज चे तिकीट जवळ बाळगणे जेणेकरून आपण रात्री अकरानंतर कशासाठी बाहेर फिरलो याचे पोलिसांना माहिती मिळाली पाहिजे. अन्यथा अकरानंतर विनाकारण फिरणाऱ्या कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments