दिशा लाईव्ह न्यूज -:- (पाचोरा - अनिल आबा येवले ) पाचोरा पोलीस स्टेशनला नुकतेच तीन दिवसापूर्वी नवीन रुजू झालेले तरुण तडफदार रुबाबदार व डॅशिंग पोलीस अधिकारी श्री राहुल कुमार पवार यांनी पहिल्या दिवसापासून पाचोरा शहरात गुन्हेगारावर वचक बसण्यासाठी कारवाई मोहीम सुरू केली असून अनेक गुन्हेगारांनी आपले बिस्तर आवरून चांगल्या कामाकडे वळू लागले आहेत.
पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी पहिल्याच दिवशी रात्री अकरानंतर फिरणाऱ्यावर कारवाई चालू केली असून तसेच ट्रिपल सीट ,विना कागदपत्र विना लायसन तसेच स्पीड मध्ये गाड्या चालविणे किंवा कर्कश आवाज करून गाडी जोरात चालवणे यावर सुद्धा त्यांनी नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न चालू असून यापुढे कोणीही रात्री अकरानंतर फिर। नये ,तसेच गाड्यांचे कागदपत्र व लायसन्स सोबत बाळगणे व कुठलेही मोटर वाहन स्पीड मध्ये चालू नये, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल.
तसेच शहरात गुन्हेगारी व दहशत निर्माण करणाऱ्या वर योग्य ती कारवाई केली जाईल. पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेबांनी यांनी आपले पोलीस अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब ,श्री संजय निकम साहेब, श्री कैलास ठाकूर साहेब ,श्री कृष्णा घायाळ साहेब, श्री सुनील पाटील साहेब, तसेच पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन पाचोरा शहरातून पायी फेरफटका मारून पाचोरा शहरात श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड ,नगरपालिका चौक, स्टेशन रोड ,प्रकाश टाकी चौक, बाहेरपुरा, आठवडे बाजार ,कृष्णापुरी ,गांधी चौक ,जामनेर रोड, या मार्गे पायी फेरी मारून संपूर्ण शहराची माहिती घेतली .
तसेच गुन्हेगारावर वचक बसविण्यासाठी त्यांनी तीव्र मोहीम सुरू केलेली आहे.
या कारवाईमुळे पाचोरा शहर आनंदाचे वातावरण झाले असून भयभीत मुक्त शहर करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेब कठोर पावले उचलली असून कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम व कारवाई सुरू राहील ,तसेच पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार साहेबांनी सांगितले की, कोणीही तरुण कार्यकर्त्यांनी मोबाईलवर स्टेटस रील किंवा व्हिडिओ वादग्रस्त ठेवू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल.
शेवटी एकच तात्पर्य-- एकच "वादा" आणि फक्त "पोलिस च दादा"
Post a Comment
0 Comments