दिशा लाईव्ह न्यूज-:- पहूर, ता. जामनेर –
शाळा आणि शिक्षकांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात. प्रत्येकाने आपल्या शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक शंकर भामेरे यांनी केले.
पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुरुगौरव सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एम. एस. आगारे होते. शाळेचे मुख्याध्यापक एस .आर . सोनवणे , संस्था प्रतिनिधी व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील , कनिष्ठ लिपिक शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . ज्येष्ठ शिक्षक विजय बोरसे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी एस. एस. पाटील, जी. व्ही. थोरात, व्ही. व्ही. भालेराव, ए. आर. पाटील, एन. ए. पाटील, आर. जी. थोरात, एस. आर. पाटील, डॉ .जे. एफ. चौधरी, टी. सी. सपकाळ, जी. एच. भामेरे, वाय. जे. मालकर, डी. वाय. गोरे, आर .बी . लोंढे एस. एस. महाजन यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा संजय मुळे, जागृती संतोष क्षीरसागर, स्नेहल योगेश बावस्कर, भूमी संदीप भडांगे, देविका सुनिल जुमडे, कुंदन कैलास कुमावत यांनी मनोगते व्यक्त केली. मंथन परीक्षेत यश संपादन करणाऱ्या तृप्ती विजय चौधरी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी दाते म्हणून माजी विद्यार्थी रामेश्वर बाबुराव पाटील, शंकर रंगनाथ भामेरे व संजय भगवान मुळे यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. डी. सुरवाडकर, आर. टी. देशमुख, भूषण पवार , व्ही. आय. अग्रवाल व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. एस. भडांगे यांनी केले.
यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता .
Post a Comment
0 Comments