Type Here to Get Search Results !

पहूरच्या लेले नगरातील रस्त्यासाठी ग्रामस्थ एकवटले ग्रामपंचायतीला निवेदन ; आंदोलनाचा इशारा


दिशा लाईव्ह न्यूज  -:- पहूर ता जामनेर...

जामनेर तालुक्यातील पहुर कसबे ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मध्ये लेले नगर भागात मुख्य रस्त्याची वाताहात झाली असून वर्षानुवर्षी ग्रामस्थांची रस्ता कॉंक्रिटीकरणाची मागणी प्रलंबितच आहे . या रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला दिले आहे .


निवेदनात म्हटले आहे की , विजय किराणा दुकान ते राजाराम बनकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच चिखलाचे साम्राज्य असते . दरवर्षी ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीकडे तोंडी मागणी करण्यात येते मात्र ग्रामपंचायतीतर्फे केवळ आश्वासन दिले जात असून रस्त्याचे काम मात्र अद्यापही प्रलंबितच आहे .

     या मार्गावरून कसबे भागातून शेतकरी बांधव शेत शिवाराकडे शेत शिवाराकडे जातात . या भागातील हा प्रमुख मार्ग आहे .मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . 


काल गुरुवारी सकाळी ( ता . १० ) देवानंद धनगर , भैया चौधरी , शंकर भामेरे , नाना सैंदाणे  , किरण देशमुख ,  

वासुदेव भिवसने यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे .

 या निवेदनावर देवानंद धनगर ,  वासुदेव भिवसने , मनोज चौधरी , संभाजी देशमुख , पुंडलिक सोनवणे , पंकज घोंगडे ,  शंकर भामेरे , स्वाती शिंदे , छाया जाधव , दिपाली कापूरे , रमेश धनगर , गणेश चौधरी ,  विनोद चौधरी , भागवत सोनवणे , कडूबा सोनवणे , सुकलाल सोनवणे , श्याम चौधरी , सुरेश भिवसने , किरण देशमुख , तोताराम जाधव ,  कैलास बनकर  , विजय कुमावत ,  सुमारे ४५  ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .



                            प्रतिक्रिया -


" विजय किराणा दुकान ते राजाराम बनकर यांच्या घरापर्यंच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून लवकरच कामास सुरुवात करण्यात येऊन समस्या सोडविण्यात येईल . "

राजू जाधव , उपसरपंच पहूर कसबे.


https://youtu.be/s_WRvyFDNss?si=Jj5iZyxEcullmnR3

वरील लिंकला क्लीक करून  ओपन करून बघा- सत्य परिस्थिती.

*पहूर कसब्यातील लेलेनगरचा रस्ता दिसेनासा.. रस्त्यावर पाणीच पाणी.*


*स्वच्छता करण्याची रहिवाशांची मागणी!*


*पहूर, ता. जामनेर –*


*पहूर कसब्यातील लेलेनगर परिसरात गटारी तुंबल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह चक्क  रस्त्यावरून वाहत असून  रस्त्याला गटार गंगेचे स्वरूप आले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा  लागत असून  आरोग्याचा प्रश्न  निर्माण होण्याची शक्यता आहे .*


                  दिशा लाईव्ह न्यूज.


स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी," अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.




Post a Comment

0 Comments