दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर तालुक्यातील पहुर येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
आज सायंकाळी सहा वाजता जळगाव शहर शिवसेना कार्यालयात शिवसेना संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगरप्रमुख माजी नगरसेवक शरद तायडे यांच्या प्रमुख उपस्थित आज हा प्रवेश सोहळा घेण्यात आला.
पहुर येथील भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे रवींद्र बारी, रविंद्र राऊत अतुल, राऊत रवींद्र जाधव ,पुंडलिक घोंगडे, हर्षल घोंगडे ,शुभम घोंगडे आदी पदाधिकारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रावेर व नंदुरबार जिल्ह्यातील संपर्कप्रमुख तथा उपनेते गुलाबराव वाघ यांच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुल भूषण पाटील ,महानगर प्रमुख शरद तायडे ,युवा सेनेचे विराज कावडिया, सुकलाल बारी ,अशोक जाधव, शिवसेना उपजिल्हा संघटक गणेश पांढरे ,पियुष गांधी, राजेंद्र पाटील ,विजय बादल, विजय राठोड ,बापु येणे ,गणेश गायकवाड, भाऊराव गोंधनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments