Type Here to Get Search Results !

तोरणाळे गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी; बग्गीतून मिरवणूक, जय भवानी–जय शिवाजीचा जयघोष


कृष्णा पाटील-तोरणाळे प्रतिनिधी.

 दिशा लाईव्ह न्यूज  ----जामनेर तालुक्यातील तोरणाळे गावात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आकर्षक बग्गीत ठेवून विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


मिरवणुकीदरम्यान डी.जे.च्या तालावर शिवभक्तीपर व सांस्कृतिक गीतांनी वातावरण भारावून गेले होते. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा–रांगोळी काढून शिवप्रतिमेचे पूजन केले.

या शिवजयंती सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकोपा जपला. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

(9309918930--फेनासाठी .होलसेल साठी संपर्क साधा)


कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जे. के. चव्हाण रावसाहेब, माजी सभापती नवलसिंह पाटील उपस्थित होते. तसेच लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, फत्तेपूर येथून बंदोबस्तासाठी आलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्यासह गावातील बालक, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तोरणाळे गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात, आनंदात व शांततेत पार पडली.

Post a Comment

0 Comments