Type Here to Get Search Results !

अज्ञात वाहनाच्या धडकेत लोहारा-एकुलती दरम्यान नीलगाय ठार

 



लोहारा-:-  . पाचोरा तालुक्यातील  लोहारा- एकुलती रस्त्यावर निलगाय अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाली आहे. सदर घटना ही 9 रोजी सकाळी उघडकीस आली.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे..अगोदरच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. या वर्षी तर 50% उत्पन्नात घट आहे.

याबाबत वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृत चौधरी यांनी वनपाल प्रकाश देवरे यांना खबर दिल्यावर त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून या नीलगाईचा दफनविधी केला.

 यावेळी वनमजूर चंद्रकांत कोळी,पत्रकार कृष्णराव शेळके, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमृत चौधरी, वनरक्षक गजानन आढावणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments