बऱ्याच ठिकाणी अनेकदा अशा काही घटना समोर येतात ज्या काही वेळातच परिसरात चर्चेचा विषय ठरतात. या घटना सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतात आणि बघता बघता त्या व्हायरलही होतात. अशीच एक अजब घटना आता अहमदनगरमधून समोर आली आहे. यात एका बोअरवेलच्या कामावेळी असं काही घडलं, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे ही घटना घडली. यात एका घराजवळ बोअरवेल मारत असताना असं काही घडलं, जे पाहून कोणीही थक्क होईल. बोअरवेल मारत असताना तिथूनच 150 फुटावर असलेल्या एका बोअरमधील पाणी बाहेर येऊ लागलं. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की बोअरवेलमध्ये टाकलेली मोटर पाण्यासोबत थेट हवेत उडू लागली

.jpg)

Post a Comment
0 Comments