पहूर , ता . जामनेर ( २६ ) संविधान आपला सर्व भारतीयांचा गौरव ग्रंथ असून विद्यार्थ्यांसह पालक - शिक्षकांनीही भारतीय संविधानाचे अध्ययन करायला हवे , अन्यायावर प्रहार करण्याची उर्जा संविधानाच्या अभ्यासातून निर्माण होते , असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे यांनी केले . ते पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात संविधान दिनी संविधान उद्देशिकेच्या अनावरण प्रसंगी बोलत होते .
तुकाराम जाधव अध्यक्षस्थानी होते. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे अनावरण करण्यात आले . बी. एन .जाधव यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले . कोमल तडवी हिने संविधान दिन गीत सादर केले. ज्येष्ठ लिपीक प्रकाश जोशी यांनी आभार मानले .यावेळी १० वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment
0 Comments