Type Here to Get Search Results !

चोपडा पंचशिल नगर येथे सविधान दिवस उत्साहात साजरा.




चोपडा शहरातील पंचशील नगर येथे 26 नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन गोपीचंद भालेराव,राजेंद्र बाविस्कर,वसंत शिंदे यांनी केले.नंतर कार्यक्रमाला सुरुवात लुंबिनी प्रवीण करणकाळे,या चिमुकलीने संविधान गीत गाऊन केले.करीना विजय शंभरकर या भिमकन्याने सविधान विषयी फार छान माहिती दिली व आधार पानपाटील सर यांनी प्रबोधन केले.संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा बि.जे.वाने सर व भरत शिरसाट सर यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पंचशील नगर भीम नगर बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments