Type Here to Get Search Results !

जि.प.मराठी शाळा वाकडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी


बाळू जोशी,वाकडी.:-:  दि.२८/११/०२३ आज वाकडी येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक भोई यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्प अर्पण केले, यावेळी अध्यक्षस्थानी दिपक भोई होते, तसेच व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनिल साबळे यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवराज बिजागरे, उपस्थित होते,जि.प‌.मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची बद्दलची माहिती दिली, विद्येचे महत्त्व पटवून दिले, शाळेचे उपशिक्षक शेखर महाजन, कैलास सोनवणे, यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची बद्दलची माहिती दिली,सुञसंचालन कैलास सोनवणे यांनी केले,आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments