जामनेर तालुक्यातील धी.शेंदुर्णी एज्युकेशन को.ऑप.सोसायटी संचलित आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव चे जिल्हाध्यक्ष/पत्रकार/लेखक/कवी/सामाजिक समन्वय समिती सदस्य/राज्यस्तरीय इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक रणजीत सोनवणे सर यांना प्रोटॉन या देशपातळीवरील अधिकृत शासन मान्यता नोंदणीकृत संघटने मार्फत सोनवणे यांच्या शैक्षणिक,सामाजिक तसेच विद्यार्थ्यांनाआनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या संदर्भातील प्रयत्नांच्या कार्याची दखल संघटने कडून घेतली गेली.आणि त्यांना सन्मानाने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या कार्याचा सर्वत्र गुणगौरव होत असून यासाठी त्यांना शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड,सेक्रेटरी सतीश चंद्रजी काशीद, सहसचिव भाऊसो दीपकजी गरुड महिला संचालिका ताईसो.उज्वला काशीद,संस्थेचे वस्तीगृह सचिव भाऊसो कैलासजी देशमुख व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. उदार सर, उपमुख्याध्यापक शिंदे सर पर्यवेक्षक जुमळे सर, पर्यवेक्षक विनोद पाटील सर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेले आहेत.


Post a Comment
0 Comments