Type Here to Get Search Results !

शेंदुर्णीत आज रथोत्सव, २७९ वर्षांची परंपरा!!!तर शेंदूर्णी येथे यात्रोत्सव.. शेंदूर्णी येथे ऐतिहासिक परंपरा कायम.



शेंदूर्णी :-:   येथे आज दि.२६ रोजी रथोत्सव साजरा होणार  आहे. संतश्रेष्ठ कडोबा महाराज  यांनी २७९ वर्षांपूर्वी सुरू केलेला  रथोत्सव आजही त्याच धामधुमीत व त्याच पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्याकरता रथोत्सव चे आयोजन समिती. व शेंदुर्णी पोलीस या प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था व तयारी वेगात सुरू आहे. 

शेंदुर्णी येथे १७४४ मध्ये कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशीला पहिला न भव्य लाकडी रथ निघाला.  तेव्हापासून अखंडपणे त्याच रितीयोजाप्रमाणे, रूढीनुसार हा रथोत्सव आजही परंपरा कायम आहे.

रथोत्सवाची तयारी करताना शांताराम महाराज भगत मंडळी परिश्रम घेत आहे.. संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांचे आठवे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत यांच्या नियोजनात व मार्गदर्शनाखाली रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून आज दुपारी १२ वाजता महाआरती पूजा होऊन रथ त्रिविक्रम मंदिर प्रदक्षिणेला निघणार अश्वमेघ, आहे. अग्रभागी लवकुश यांनी पकडलेला घोडा याचा सजीव देखावा, तर दुसऱ्या घोड्यावर श्रीराम चंद्राची प्रतिमा घोड्याच्या मागे बारा बैलगाड्या सजवलेल्या राहतील. तसेच विविध देवतांची रूपे बालगोपाल साकारणार आहेत.

 पोलिसांचा चोख बंदोबस्त, मिरवणुक मार्गावर स्वच्छता...

रथ त्रिविक्रम प्रदक्षिणेला निघण्या आधी रथाची आरती संत मंहत, मान्यवर व भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर रथ प्रदक्षिणेला निघेल. रथ घरापासून अग्रसेन चौक, महावीर मार्ग ते त्रिविक्रम मार्ग तेथून राणी नुराणी मशिदीमार्गे गांधी चौकातून मिरवणुक निघेल. रथोत्सवाच्या मार्गात तसेच नदीकिनारी भरणाऱ्या यात्रेत पहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, शेंदुर्णी आऊट पोस्टचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या वतीने गावात साफसफाई व स्वच्छता करण्यात आली असून विविध ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात येत आहे.

झेंडूच्या माळांनी सजला रथ


भजनी मंडळी महिला पुरुषांची गट जयघोष करीत वातावरण भक्तिमय करतील. पालखीत त्रिविक्रम भगवान कडोजी महाराजांची प्रतिमा व गरुडाची मूर्ती विराजमान राहणार आहे. त्यानंतर भव्य अशा कोरीव नक्षी काम केलेला ३० फूट उंचीचा सागवानी रथ डोळ्याचे पारणे फेडत ४० भाविकांच्या हातांनी ओढल्या जाणार आहे. रथावर दोन पांढरे शुभ्र घोडे असून त्यावर भगवान श्रीकृष्ण

स्वार आहेत. रथात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती विराजमान राहणार असून रथाला मोठमोठ्या झेंडूच्या माळांनी सजवण्यात आले आहे.


नाही

Post a Comment

0 Comments