Type Here to Get Search Results !

सातगाव डोंगरी येथे पत्नीकडून पतीवर घरगूती हत्याराने वार---पती गंभीर--पिंपळगाव येथे गुन्हा दाखल.




 पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील पतीवर - पत्नीने धारदार विळ्याने वार करीत जखमी केल्याची घटना घडली आहे, रमजान तडवी वय 40 धंदा मजूरी राहणार सातगाव डोंगरी ता पाचोरा हे दि. 09 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 04.00 वा चे सुमारास शेतात कामावर असतांना त्यांना पत्नीने फोन केला असता रमजान तडवी लागलीच कामा वरुन घरी गेले. तेव्हा घरी पत्नी, व त्यांचे माहेरील मंडळी महिलांसह हजर होते. तेव्हा त्यांच्यात घरगुती बोलणी सुरु असतानाच माहेरच्या मंडळींनी रमजान तडवी यांना शिविगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहान करण्यास सुरवात केली, मारहाण सुरू असतानाच रमजान तडवी यांचे पत्नी हिने तिचे हातातील विळा उजव्या हाताचे पंज्या जवळ मारला, यात ते गंभीर जखमी झाले, तेव्हा रमजान तडवी यांचे आई-जायदाबाई हि भांडण सोडविण्यास आली असता वरील सर्वांनी आई हिसदेखील चापटा-बुक्क्यांनी मारहान करून शिविगाळ केली तेव्हा रमजान तडवी यांचे हातातुन रक्तस्त्राव होऊ लागल्याने ग्रामस्थांनी येऊन भांडण सोडवले, पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देतेवेळी त्यांच्या हाताला दुखापत झालेली असल्याने पोलीसांनी त्यांना मेडीकल मेमो दिला, ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे, ता.पाचोरा येथे औषधोपचार घेवुन त्यांनी पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिली असून आज दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी हाती आलेल्या माहितीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलिसात पत्नीसह माहेरची मंडळी असे संशयित 4 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस रवींद्र पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments