लोहारा तालुका पाचोरा येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोद्येतील मंदिरामध्ये भव्य प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने लोहारा गावातील 6 दिसंबर 1992 रोजी जी कार सेवा झाली होती .त्या कार सेवेमध्ये जे लोहारा गावातील दोन राम भक्त गेले होते त्या दोन राम भक्तांचा सत्कार लोहारा ग्रामपंचायतचे वतीने तसेच लोहारा नगरीतील ग्रामस्थांचे वतीने करण्यात आला.
ह्या राष्ट्रीय महान कार्यात कुठेतरी आपले योगदान होते व आज तो दिवस प्रभू श्रीरामांचे मंदिर होताना याची देही याची डोळा बघायला मिळत आहे व आयुष्याचे सार्थक झाले ही भावना सत्कारमूर्ती अशोक चौधरी तसेच माधव चौधरी यांनी व्यक्त केली थोडक्यात असे की सहा डिसेंबर 1992 की कारसेवा में विश्व हिंदू परिषदके नेता अशोकजी सिंघल, और भाजपाके नेता लालकृष्ण अडवाणीजी ने नारा दिया था!
समाजातील त्यांचे अविस्मरणीय योगदान आणि कामगिरी लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे,अयोध्येतील कारसेवक हा एक गट आहे ज्यांनी अनेक दशकांपासून अयोध्येत राम मंदिराची मागणी केली आहे आणि ती मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष केला आहे,कर म्हणजे हात, म्हणजेच जे नि:स्वार्थीपणे आणि विनाशुल्क काम करतात त्यांना कारसेवक म्हणतात. भारतातील बहुतेक काम धर्माशी संबंधित असल्याने, करसेवक हा शब्द निःस्वार्थपणे आणि विनाशुल्क धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी देखील वापरला जातो. म्हणून आशा आपल्या लोहारा गावातील करसेवकांचे देखील ह्या महान यज्ञात योगदान लाभले आहे म्हणून त्यांचे आपण सर्व जण अशोक सोनजी चौधरी व माधव देवचंद चौधरी ह्या दोघे कारसेवक यांचे आपण सर्व जण ऋणी आहोत व भावी आयुष्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा व ह्या आजच्या 22 जानेवारी श्रीरामल्ला यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी लोहारा नगरीतील ग्रामस्थ तसेच सर्व रामभक्त सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील विविध संघटना मधील हिंदुत्ववादी संघटनांमधील मंडळींची उपस्थिती होती याव्यतिरिक्त देखील प्रभु श्रीराम मंदिरात देखील दोघे सत्कार मूर्ती यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी त्यांचे सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments