Type Here to Get Search Results !

लोहारा येथे जेष्ठ नागरिक संघाकडून गावात तिळगुळ वाटप,तर जेष्ठमहिलांकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम .


लोहारा येथील आदर्श असा जेष्ठ नागरिक संघाकडून नेहमीच उत्कृष्ट असे कार्यक्रम गावात राबविण्यात येतात. दर रविवारी गावातील सर्व जेष्ठ मान्यवर एकत्र येणे,एकमेकांचे दुःख जाणणे,शिवाय गुप मधील सदस्यांचे वाढदिवस साजरे करणे, असे खूप काही कार्यक्रम ते आवर्जून घेत असतात.


दि.14/01/24 ला जेष्ठ नागरिक संघाचे साप्ताहिक सभा संपन्न झाली.त्यावेळी त्यांनी  त्यात 42 सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले, तर   दि 15/01/24 ला सर्व सभासदांने गावात रॅली काढून तिळगुळ आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक संघातील महिलांनी केलेल्या हळदीकुंकू या या कार्यक्रमाचे गावात कौतुक करण्यात आले. .रॅलीत 72 महिला व 43 पुरूषांनी सहभाग नोंदवला  होता.रॅलीत  जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार, सचिव बाबुलाल बोरसे,अ अ पटेल सर, प्रभाकर गुरुजी, लक्ष्मण माळी,बाबुराव सोनू,रामचंद्र काळे, ,कडूबा देशमुख, विश्वासराव पाटील, श्रीराम कलाल बाबुलाल सुतार डब्लु एस पाटील सर आदिंनी नियोजन करून सहभाग नोंदवला..! कार्यक्रमाची सांगता महादेव मंदिरात करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विश्वासरावभाऊ शेळके  यांनी उपस्थितांनचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments