अनिल आबा येवले -पाचोरा
पाचोरा येथील शेतकरी संघाची निवडणूक लागलेली असून पंधरा जागांसाठी 63 उमेदवारांनी फॉर्म भरलेली असून 24 तारीख अंतिम माघारीची असून सर्व पक्षांनी फॉर्म भरलेले असून पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील व माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी युती केली असून त्यामध्ये माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी नऊ उमेदवार उभे केले आहे व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांचे सहा उमेदवार असून सौ वैशालीताई सूर्यवंशी व श्री अमोल शिंदे यांनीही पंधरा जागेसाठी फॉर्म भरलेले असून आज रोजी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असता श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की शेतकरी हितासाठी शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू बिनविरोध झाल्यास अधिक आनंद निवडणूक लागल्यास आमच्या गटाचे 15 चे 15 उमेदवार निवडून येतील अशी श्री दिलीप भाऊ वाघ व आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले यावेळी दोन्ही गटाचे उमेदवार नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments