बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०७/०२४ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणाऱ्या लाडकी बहिण या योजनेची घोषणा केली,गाव-गावात,घरा-घरातील महिला, पुरुष या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करत आहे, लाडकी बहिण योजनेच्या नादात माञ पीक विम्याची अंतिम तारीख जवळ येऊन ही पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना विसर पडण्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे,
राज्य सरकारने नुकतेच जाहीर अर्थसंकल्पामध्ये विविध नवीन घोषणा केली आहे , त्यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या महाराष्ट्रातील पाञ महिलांना एक हजार पाचशे मानधन दिले आहे,या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रांची जमवाजमव करतांना महिला, पुरुष व्यस्त आहेत लाडकी बहिण योजनेच्या नादात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या खरिपाचा पीकविमा भरण्यास विसर पडला की काय असं चित्र दिसून येत आहे,
प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे, सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचा एक रुपयांमध्ये पीक विमा काढला जात आहे,तरी कडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Post a Comment
0 Comments