दिशा लाईव्ह न्यूज -:-- भुसावळ येथून निघणारी बस लोहारापर्यंत येजा करत होती परंतु त्या बसचा उपयोग शहापूरा येथील विद्यार्थ्यांना होत लोहारा विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यु .डी . शेळके,आदर्श पर्यवेक्षक पी एम सुर्वे यांनी भुसावल आगर प्रमुख शिवदे साहेब यांना लेखी निवेदन दिले.तसेच ही बस शहापूरा पर्यंत नेऊन विद्यार्थ्यांना त्या बसचा उपयोग होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब निदर्शनास आणून दिली.
आगार प्रमुख शिवदे साहेब यांनी सुद्धा या गोष्टीची त्वरित दखल घेऊन पाचोरा लोहारा असणारी बस ही शहापूरा पर्यंत नेण्यास परवानगी दिली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने या बसचे वाहक व चालक दीपक शांताराम सोनवणे, के व्ही हिवराळे यांचा शहापूरा येथे रुमाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन गावातील सरपंच योगेश भाऊ परदेशी गजानन माळी, राजेंद्र परदेशी , दिलीप राजपूत, संदीप परदेशी, भगवान परदेशी,सामाजिक कार्यकर्ते ईश्वर परदेशी, नथ्थू परदेशी , पत्रकार दिलीप राजपूत गावातील महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी बस पूजनासाठी उपस्थित होत्या.
यावेळी विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विश्वासराव भाऊ पाटील, माजी मुख्यध्यापक व समितीचे उपाध्यक्ष अ अ पटेलसर, देवेंद्र शेळके , विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एस एस गुजर, वाय पी वानखेडे, बी एन पाटील उपस्थित होते.
ही बस सुरू व्हावी यासाठी विद्यालयाच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला. तसेच राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन व संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांचे अनमोल सहकार्य लाभले.
याबद्दल विद्यालयाच्या वतीने भुसावल आगार प्रमुख यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थिनींना शासन नियमानुसार मोफत पासेस मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा पासेस मिळतील . विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक पी यू खरे सर व किरण बारी सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यामुळे गावातील पालकांनी सुद्धा बस सुरू झाल्यामुळे आनंद व्यक्त केलेला आहे.
.jpg)


.jpg)
Post a Comment
0 Comments