Type Here to Get Search Results !

ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपली आई : हभप मुकुंदा महाराज यांचे गौरवोद्गार पहूरला सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण ; रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताहास कलश पूजनाने प्रारंभ


शंकर भामेरे , पहूर , ता . जामनेर ( ता . २८ )  ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून  ज्ञानेश्वरी ही आपली आई असल्याचे गौरवोद्गार  समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष ह .भ .प . मुकुंदा महाराज पहूरकर यांनी काढले . संत शिरोमणी सावता महाराज आणि संत नामदेव महाराज या संतद्वयींच्या पुण्यतिथी सोहळ्यात आयोजित रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताह निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते . 

ते पुढे म्हणाले की , ग्रंथराज ज्ञानेश्वरीकडे ग्रंथ म्हणून पहाल तर तुम्हास पीएचडी मिळेल , मात्र आई म्हणून पाहाल तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही . 


क्षत्रिय माळी समाज संघटना आणि श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित कीर्तन सप्ताहास संत सावता महाराज मंदिरात शनिवारी क्षत्रिय माळी समाज संघटनेचे सचिव विकास उबाळे यांच्या हस्ते सपत्नीक कलश पूजनाने प्रारंभ झाला . शिवाजी सुरडकर यांनी पौराहित्य केले . याप्रसंगी  समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प विठ्ठल राऊत यांच्यासह समस्त टाळकरी मंडळीने टाळ -मृदंगाच्या गजरात भजन गायीले .

 महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित कीर्तन  सप्ताह दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून दररोज रात्री ८ . ३० ते १० . ३०वाजेच्या दरम्यान  हरी कीर्तन होत आहे . भाविक मोठ्या संख्येने  धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत .

Post a Comment

0 Comments