शंकर भामेरे , पहूर ,ता . जामनेर ( ता . २८ )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै दरम्यान सर्वच शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले .
पहूर कसबे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार विद्यालयात शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले .
शैक्षणिक सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजीत करण्यात आला होता . ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश होता . हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्या मध्ये सहकार्य वाढविणारा असल्यामुळे, शिक्षणाविषयी जनजागृती , पर्यावरण रक्षण (वृक्ष लागवड ) विषयी संदेश देण्यात आला.
शिक्षण सप्ताह दरम्यान दररोज विविध प्रकारचे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये निपुण प्रतिज्ञा, तरंग चित्रे,खेळ व खेळाचे महत्व, पारंपारिक वेशभूषा, पथनाट्य, नृत्य ,गीत गायन,मातीकाम,वृक्षारोपण यासारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण सप्ताहाची सांगता बाल -गोपालांचे स्नेह भोजन व प्रभात फेरी ने करण्यात आली .
शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख , अमोल क्षिरसागर , मनोज खोडपे , संदिप पाटील , सोनाली सोनाली शेकोकारे , यूनूस तडवी विद्या पवार , किरण पाटील यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments