बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.दि.२८/०७/०२४
आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद केंद्रशाळा वाकडी येथे शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव या शेवटच्या दिवशी तिथी भोजनाचे आयोजन करण्यातआले,गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.युवराज बिजागरे पेंटर यांनी त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले,
शाळेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक उपशिक्षक त्याचप्रमाणे शाळेचे सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, शाळेत समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी व शाळेच्या विकासासाठी यासारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी बोलून दाखवले,
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवकाबाई दीपक भोई शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.अतुल राऊत,श्री सुनील साबळे ,श्री राजूभाऊ चांदणे,श्री निर्मल काळे,श्री भागवत आव्हाड,श्री रामधन बिडके, विलास जोशी, हे उपस्थित होते, सकाळ प्रतिनिधी प्राध्यापक बि.एम.जोशी, देशदूत प्रतिनिधी ज्ञानेश्वर खडसे, वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक शिंदे सर, उपशिक्षक कैलास सोनवणे, उपशिक्षक शेखर महाजन, उपशिक्षक सूर्याजी काकडे, उपशिक्षका श्रीमती स्वाती पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments