Type Here to Get Search Results !

तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १४, १७ वर्ष गटात लॉर्ड गणेशा स्कूल व १९ गटात इंदिराबाई ललवाणी विद्यालयास दुहेरी मुकुट:


दिशा लाईव्ह न्यूज।  :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जामनेर नगर पंचायत समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ यांच्यातर्फे तालुकास्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा लॉर्ड गणेशा स्कूलच्या मैदानावर काल दि.27 जुलै रोजी संपन्न झाल्या.


स्पर्धेचे उद् घाटन लॉर्ड गणेशा स्कूलचे उपप्राचार्य  गणेश पालवे यांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन तथा मैदानात श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी लॉर्ड गणेशा स्कूलचे समन्वयक विजय मोरे, तालुका क्रीडा संयोजक प्रा.डॉ.आसिफ खान, नरेंद्र पाटील, गजानन कचरे, झहीर खान, वसीम अहमद, अझीम, गिरासे, फुटबॉल कोच उदय फालक, हिमाली बोरोले आदी. मान्य.उपस्थित होते.


स्पर्धेचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले. 

 राज्य खेळाडू प्रियंका कोळी यांनी खेळाडूंकडून शपथ घेतली. तालुक्यातून १४ संघानी सहभाग घेतला होता.

           स्पर्धेत प्रमुख फुटबॉल राष्ट्रीय पंच विजय निकम, रेषा पंच म्हणून अजहान पटेल, सादिक अली तर गुणलेखक प्रा. डॉ.असिफ खान यांनी काम पाहिले.

        स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती प्रमुख नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव, अशोक मोरे, आदी.परिश्रम घेतले.

 ◼️ फुटबॉल संघाचा निकाल पुढीप्रमाणे:-

▪️१४ वर्ष मुले - 

विजयी : लॉर्ड गणेशा स्कूल 

उपविजयी: अंजुमन स्कूल 

▪️१७ वर्ष मुले-

विजयी : लॉर्ड गणेशा स्कूल 

उपविजयी: अंजुमन स्कूल 

▪️१७ वर्ष मुली  - 

विजयी : जिनियस स्कूल 

उपविजयी: लॉर्ड गणेशा स्कूल 

▪️१९ वर्ष मुले - 

विजयी : इंदिराबाई ललवाणी विद्यालय,जामनेरपुरा

▪️१९ वर्ष मुली- 

विजयी:इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेरपुरा


Post a Comment

0 Comments