Type Here to Get Search Results !

अखेर भिक मांगो आंदोलनानंतर सुरू झाले स्मशानभूमीतील सांत्वन शेड काम दिशा लाईव्ह न्यूज इम्पॅक्ट ! ग्रामस्थांनी मानले आभार. एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराला आदेश!



शंकर भामेरे ,पहूर , ता . जामनेर ( ता . ३१ )  पहूर कसबे येथील हिंदू स्मशानभूमीतील रखडलेले सांत्वन शेडचे काम ग्रामपंचायत सदस्य विक्रम पंडित घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली पुकारल्या गेलेल्या  भिक मांगो आंदोलनानंतर अखेर सुरू झाले असून लवकरच ते पूर्णत्वास येणार असल्याची माहिती त्यांनी दिली . याविषयी दिशा लाईव्ह न्युजसह प्रसार माध्यमांनी वाचा फोडून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते .

     याबाबत सविस्तर वृत्त असे की , पहूर कसबे येथे  वाघूर नदीच्या तीरावर स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शोकाकुल  नातेवाईक तसेच आप्तस्वकीयांना बसण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद मार्फत ७ लाख रुपये निधीचे सांत्वन शेड मंजूर झालेले आहे . परंतु  सदर काम अर्धवट स्थितीत रखडल्याने पहूर कसबे ग्रामपंचायतीचे सदस्य विक्रम पंडित घोंगडे यांनी भिक मांगो आंदोलन पुकारले होते .

        या आंदोलनाची दखल घेत अखेर जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश पवार यांनी  संबंधित ठेकेदार व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  याविषयी लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करून  ठेकेदारास सदर काम १ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिलेले होते . तथापि १ महिन्यात काम पूर्ण झाले नसले तरी सुरुवात मात्र झालेली आहे . लवकरच हे काम पूर्ण होऊन शोकाकुल नातेवाईक , आप्तांना दिलासा मिळणार असल्याचे आंदोलन करते विक्रम घोंगडे यांनी दिशा लाईव्ह न्यूज शी बोलताना सांगितले .

Post a Comment

0 Comments