Type Here to Get Search Results !

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने पहूर येथे महाराक्तदान शिबीर 250बाटल्यांचे संकलन :35महिलांनीही घेतला सहभाग


दिशा लाईव्ह न्यूज  -:-   जामनेर तालुक्यातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पहूर येथे मुस्लिम समाजजबांधावंतर्फे महाराक्तदान शिबीर घेण्यात आले.

शिबिराचे उदघाट्न जामनेरच्या नगरध्य क्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव येथील इकरा महाविद्यालयाचे चेअरमन हाजी अब्दुल मजीद जकरिया तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ऍड. सलीम खान, पाचोरा उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप,  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना उपजिल्हा संघटक तथा पत्रकार गणेश पांढरे माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, ऍड. संजय पाटील, पहूर पेठचे सरपंच अब्बू तडवी,उपसरपंच शरद पांढरे,माजी उपसरपंच शाम सावळे, रवी मोरे,  राजू पाटील, योगेश भडांगे, शंकर जाधव, महेश पाटील, समाधान पाटील, इका पहेलवान, अर्जुन लहासे, ललित लोढा, संजय देशमुख, सलीम मौला, मिनाज शेख, मुन्ना पठाण, मौलाना मुजाहीद, यासह अनेक हिंदू मुस्लिम मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंम्बर यांच्या जीवन चरित्र्यावर अब्दुल मजीद जकरिया, राजधर पांढरे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, प्रदीप लोढा, ऍड. संजय पाटील, रामेश्वर पाटील, गणेश पांढरे, ऍड. सलीम खान आदींनी मनोगत व्यक्त केले.

पहूर येथे प्रथमच एवढ्या मोठया संख्येने महिलांसह  250नागरिकांनी रक्तदान केले. यात 35महिलांनीही सहभाग नोंदविला. हे शिबीर डॉक्टर नजमोद्दीन तडवी यांच्या नवोदय रुग्णालयात घेण्यात आले,जळगाव येथील रेड प्लस रक्तपेढी चे डॉक्टर सय्यद अली, अमोल शेलार, वीरेंद्र बिऱ्हाडे, पंकज गायकवाड, शाहिद शेख, अमोल पाटील व त्यांचे सहकारी रक्त पिशव्याचे संकलन केले.

 या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर मोईनोद्दीन शेख, शरीफ शेख, शाहरुख खान, अल्ताफ खान, साबीर पिंजारी, जाकीर साबीर, शाहरुख तडवी,डॉक्टर जलाल शेख, डॉक्टर बोरसे, मोईद्दीन, बिस्मिल्लाह पिंजारी, तोफीक तडवी, शेखचाँद तडवी यांच्या सह अनेक मुस्लिम समाज बांधवानी परिश्रम घेतले. या शिबिराचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इब्राहिम शेख तर आभार डॉक्टर मोईनोद्दीन शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments