Type Here to Get Search Results !

पहुर – शेंदुर्णी रस्त्यावरील शेतातून दोन बैल व एका म्हैसची चोरी पहुर पोलीसात गुन्हा दाखल..शेतकऱ्यांनामध्ये चिंतेचे वातावरण


पहुर –  सध्या जामनेर तालुक्यात चोरट्यानि पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामनेर तालुक्यातील पहुर – शेंदुर्णी रस्त्यावरील शेतातून दोन बैल आणि एक म्हैस चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी पहुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पहुर – शेंदुर्णी रोडवरील गोंदेगाव शिवारात कोकीलाबाई हिरालाल कुमावत यांचे शेत आहेत. काल रात्री 9 वाजेच्यासुमारास कोकीलाबाई व परिवारातील सदस्य शेतातून कामे करून घरी आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोकीळाबाई कुमावत शेतात गेले असता त्या ठिकाणी दोन बैल, दोन म्हैस, दोन म्हशीचे वगारू या पैकी दोन बैल व एक म्हैस चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोकीलाबाई हिरालाल कुमावत यांच्या फिर्यादीवरून पहुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments