नाशिक -:-- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) नगरसुल जायदरे ता. येवला, रस्त्याची, अत्यंत बिकट दयनीय अवस्था झाल्याने, या मार्गावरील एसटी बस बंद करण्याची वेळ आली आहे, एसटी बंद असल्यामुळे लाईट ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. नगरसुल जायदरे रस्ता तात्काळ दुरुस्त करून त्वरित नव्याने डांबरीकरण करण्यासाठी त्वरित आदेश देण्यात यावे व. या परिसरातील सर्व नागरिकांवरील होणारा अन्याय / तात्काळ दूर करावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी यावेळी बोलताना केली आहे नगरसुल ते जायदरे हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून खराब झालेला आहे त्यापैकी नगरसुल ता. येवला, येथील कदम वस्ती जवळील फाट्यापासून साधारणपणे एक किलोमीटरच्या आत अंतरावर, वरील हा रस्ता दोन-तीन महिन्यापूर्वी एका ठेकेदाराने काम केले, परंतु पावसात हा रस्ता संपूर्णत: खड्ड्यात गेलेला आहे, जागोजागी उघडलेला असून हे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे झाल्याची तक्रार अनेक ग्रामस्थांनी केलेली आहेत,परंतु याकडे जाणून बुजून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर हा रस्ता नादुरुस्त झालेला आहे.
तरी साधारणपणे, नगरसूल पैठणकर वस्तीपासून हा रस्ता जसाच्या तसा असून त्याजवळ ठीक - ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे, त्या ठिकाणी कामासाठी खडी देखील टाकलेली आहे परंतु हे काम संपूर्णपणे अपूर्ण पद्धतीत पडलेले आहे तरी या कामाची पूर्तता करण्याची मागणी नगरसुल जायदरे ता. येवला या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे.
नगरसुल जायदरे या रस्त्यालगत असणाऱ्या सर्वच, वाड्या वस्त्यावरील रहिवाशी नागरिकांना येवला तालुक्याच्या ठीक - ठिकाणी गावाकडे येणे - जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा बेमुदत आमरण उपोषण व जन आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


Post a Comment
0 Comments