Type Here to Get Search Results !

मा.श्री विजय चौधरी यांना राज्यपाल नामनिर्देशीत यादीमध्ये आमदार म्हणून नियुक्ती करणे बाबत तेली समाजाची मागणी.



दिशा लाईव्ह न्यूज --::--- आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करणेबाबत हालचाली सुरू आहेत.त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून भाजपाचे प्रदेश महामंत्री व तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री विजय भाऊ वसंतराव चौधरी नंदुरबार यांना संधी देण्यात यावी अशी मागणी खान्देशातील समस्त तेली समाजाच्या वतीने करण्यात आली. 

भाजपाचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री मा.श्री गिरीश भाऊ महाजन यांची जामनेर येथे भेट घेऊन उत्तर महाराष्ट्रातील समस्त तेली समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन ही मागणी केली. खान्देश तेली समाज मंडळ,प्रदेश तेली महासंघ तसेच नाशिक,नंदुरबार,जळगाव, धुळे,नगर जिल्ह्यातील असंख्य तेली समाज बांधवांनी आपापल्या शाखांचे निवेदन गिरीश भाऊ महाजन यांना देऊन विजय भाऊ चौधरी यांना आमदार म्हणून संधी द्यावी अशी मागणी केली.

यावेळी धुळे,चाळीसगाव,नाशिक, शिर्डी,नंदुरबार,तळोदा,जळगाव जामनेर,चाळीसगाव,चोपडा, येवला, कोपरगाव, मालेगाव,मनमाड, एरंडोल,नांदगाव,निफाड,पारोळा येथील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.विजयभाऊ चौधरी यांचे संघटन कौशल्य व समाज तसेच भाजपातील कार्य पाहता त्यांना संधी देण्यात यावी अशा आशयाचे तेली समाजाचे निवेदन स्वीकारून गिरीश भाऊ महाजन यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले.




Post a Comment

0 Comments