दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 19-जामनेर मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्यातील थेट लढतीने तालुक्यात मोठी चुरस निर्माण केली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमधील लढतीने स्थानिक राजकारण तापले असून, मतदारांसह तालुकावासीयांच्या मनात "कोणाचा विजय होणार?" याची उत्सुकता वाढली आहे.
वीस ते पंचवीस वर्षापासून नामदार गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा निवडणूक लढविणारे संजय गरुड, युवा नेते डॉक्टर सागर गरुड, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद,पहूर पेठ ग्रामपंचायत वर 30 वर्षे पासुन वर्चस्व असणारे प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, पहूर पेठ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य श्याम सावळे व पहूर कसबे ग्रामपंचायत सदस्य विवेक जाधव, माझी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बनकर,
तर लोहारा, ता.पाचोरा येथील विद्यमान सरपंच आणि तालुक्यात नावलौकिक असलेले श्री अक्षय कुमार जैस्वाल, सुरेश गडबड चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख,अर्जुन पाटील,हिरालाल जाधव,राहुल कटारिया, या मान्यवरांसह अनेक तरुणांनी भाजपात प्रवेश केलेला आहे.
मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा आता किती मतदान लोहारा-कुर्हाड गटात वाढते? याबाबत जनतेत उत्सुकता आहे.
,इतर नेतेमंडळींनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला या प्रवेशाचा नेमका नामदार गिरीश महाजन यांना फायदा होणार की नुकसान याचे चित्र येणाऱ्या निकालावर अवलंबून आहे खरंच नामदार गिरीश महाजन यांना या नेतेमंडळींच्या गावातून किंवा वार्डातून लीड मिळणार का.?किती लीड वाढेल?
.की यांच्यामुळे विरोधात उभे असलेले दिलीप खोडपे यांना लाभ मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आता पर्यंत गिरीश भाऊना लोहारा-कुर्हाड गटानेच तारले आहे. बघूया... यावेळेस हा गट भाऊंना किती लीड देतो की खोडपे सरांना!!

Post a Comment
0 Comments