दिशा लाईव्ह न्यूज --::--- जळगांव जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जामनेर विधानसभेत पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी विजय संपादन केला आहे.
जामनेर विधानसभा हा तीस वर्षांपासून राज्याचे संकटमोचक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाणारे ना. गिरीश भाऊ महाजन यांचा बालेकिल्ला आहे .तो गड टिकवून ठेवण्यात गिरीश भाऊ यशस्वी ठरले. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर हे उमेदवार होते.
नवखे उमेदवार असलेले दिलीप खोडपे यांनी मतदार संघातील बऱ्याच गावामध्ये काटे की टक्कर दिली आहे. मात्र तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये लीड घेण्यात खोडपे सर अयशस्वी ठरल्याने त्यांना त्यांना जवळपास 25 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
ना. गिरीश भाऊ महाजन यांनी तालुक्यातील विकास कामांचा जो मुद्दा उपस्तित केला होता ,त्यास जामनेर तालुक्यातील मतदारांनी पसंती दिली आहे.
तसेच शिंदे सरकारने नुकतीच लाडली बहीण योजना ही जामनेर सह संपूर्ण महाराष्ट्र भर प्रभावी ठरल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
ना. गिरीश भाऊ महाजन हे सातव्यादा निवडणूक जिकंले व नवा विक्रम त्यांनी नोंदवला .
पुन्हा मी मतदारांचा व जामनेर तालुक्याचा विकास करिन आणि जनतेच्या भावनांचा आदर करील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिकता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले अश्या भावना ना. गिरीश महाजन व भाजपा पदाधिकारी यांनी बोलून दाखविल्या.
भाऊंच्या विजयाने लोहारा येथेही कार्यकर्त्यांनी निकाल घोषित होताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
दिलीप खोडपे सर हे पहिले उमेदवार ठरले ज्यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात 1 लाखांचे वर मते घेतली. कारण इतके 6 वेळेस कुठल्याही विरोधकांनी इतके मताधिक्य घेतले नाही जे खोडपे सरांनी 101782 इतके मताधिक्य घेऊन गिरीश महाजन हे 26.885 मताधिक्य जास्तीने निवडून आले. त्यामुळे महाजनांना भविष्यात मतदार संघात जास्तीचे लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments