Type Here to Get Search Results !

लोहारा येथे 2 दिवस रंगणार यात्रा!! आज दत्त जयंती होणार साजरी ..आणि उद्या पीर बाबा (पिरोबा ) उत्सवानिमित्त 15 ला होणार कुस्त्यांची दंगल!! तर रात्री तमाशाचे आयोजन.



 दिशा लाईव्ह न्यूज -:-  पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे उद्या दत्त जयंती निमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी  सर्व कुस्ती  मल्लांना व शोकीनांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे या वर्षीही  श्री दत्त जयंती व पीर बाबा यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल (स्पर्धा) आयोजित केली आहे.

 उद्या दि.15 डिसेंबर रोजी सकाळी 12ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन (दुरक्षेत्र) लोहारा समोरील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

कार्यक्रमास महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ लोहारा यांनी केले आहे.

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ना. गिरीश महाजन,उद्योजक शांताराम पाटील, संजय पाटील,  भाजपाचे सुहास पाटील, पाचोरा येथील अमोल शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते संजयदादा गरुड,  डॉ. सागर गरुड,  लोहारा येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, कैलास चौधरी,  डॉ. मनोहर पाटील,  लोहारा नगरीचे विद्यमान सरपंच अक्षय जैस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे,लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते  रामचंद्र भिवसने, ईश्वर शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments