Type Here to Get Search Results !

एका वर्षाच्या आत मयत मुख्यध्यापकाच्या परीवाराला कोर्टामार्फत मिळाली 44 लाख रूपयाची नुकसान भरपाई...तर दुहेरी अपघातात देखील विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास बाध्य. तीन्ही मयतांना 73,75,000/- नुकसान भरपाई





दिशा लाईव्ह न्यूज -:-   पंचायत समिती जामनेर अर्तगत वाडी किल्ला ता. जामनेर जि. जळगांव या ठीकाणी प्राथमीक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले ईश्वर त्र्यंबक पारधी रा. मालदाभाडी ता. जामनेर यांचा 24/11/2023 रोजी रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. या ठिकाणी थोडया वेळापुर्वी एका दुचाकीला आग लागली होती. त्या मोटार सायकलवर दोन व्यक्ती स्वार होत्या त्या व्यक्तीचे नाव सुनिल गंगाराम भोई रा. बोदवड व दत्तात्रय रामा माळी रा. बोदवड यांच्या मोटार सायकलला आग लागली होती. सदर मोटार सायकल हिला याच केटा कार कं. MH-12-MW-7013 ने ठोस मारली व हे दोन्ही देखील घटनास्थळीच मयत झाले. सदर केटा कार ही अनियत्रिंत झाली व पुढे जाणारे शिक्षक ईश्वर त्रंबक पारधी यांना ठोस मारली. केटा कार कारच्या एअर बॅग उघडल्याने क्रेटा कार मधील प्रवाशी यांना जिवनदान मिळाले. अशा भिषण अपघातात तिन व्यक्ती मयत झाले व दोन मोटार सायकलचे आतोनात नुकसान झाले.



प्रथमदर्शनी केटा कार कं. एम.एच. 12 एम.डब्ल्यु. 7013 कार चालक भगवान विष्णु चोपडे, पुणे यांच्यावर जामनेर पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 304अ नुसार गुन्हा नोदंविण्यात आला व आरोपीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी जामीनावर मुक्तता केली.


शिक्षकाच्या अपघाती निधनामुळे व घरातील कर्ता व्यक्तीचा आकस्मीक मृत्यु झाल्या कारणाने शिक्षकाच्या वारसांनी जळगांव येथे अॅड. महेंद्र सोमा चौधरी व त्यांचे सहकारी यांचे मार्फत सामनेवाला हुयायी कीयेटा गाडी चालक भगवान चोपडे यांच्या विरूध्द नुकसान भरपाई मिळणेकामी दावा दाखल केला. 

सदरची सामनेवाला गाडी ही विमाकृत असल्या कारणाने सामनेवाला गाडी चालक, मालक व त्यांच्या रॉयल सुदरम जनरल इंश्युरंन्स विमा कंपनी यांच्या विरूध्द नुकसान भरपाई दाखल केली विमा कंपनीने भरभक्कम बचाव घेतला होता की, सदरचा अपघात हा विमाकृत कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला नाही. मयत हे विना हेल्मेट रस्त्याने प्रवास करीत असतांना मयताच्या निष्काळजीपणामुळे सदर अपघात झालेला आहे. परंतु, या कारणास्तव विमा कंपनी विमा देण्यास नकार देवु शकत नाही. ही बाब प्रथमदर्शनिय अर्जदारांच्या वकीलांनी कंपनीच्या व कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिली.


मयत हे प्राथमीक शिक्षक म्हणुन पंचायत समिती जामनेर अर्तगत कायम स्वरूपी शासकीय नोकरीवर होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुले, मुलगी, आई व वडील एवढे कुटुंब होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या धोरणानुसार नुकसान भरपाईची मागणी त्यांचे वकील अॅड. महेंद्र सोमा चौधरी, जळगाव यांनी केली होती. सदरचे प्रकरण हे लोकन्यायालयापुढे ठेवण्यात आले व अर्जदार व प्रतिवादी तसेच विमा कंपनीचे वकील यांचे समक्ष चर्चेअंती विमा कंपनीने नुकसान भरपाई पोटी मयत शिक्षकाला 44 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश स्वीकारले. त्यांचे इतर 2 मयत नामे सुनील गंगाराम भोई व दत्तात्राय रामा माळी यांच्या आश्रीतांना नुकसान भरपाई म्हणुन 13,30,000/- व 15,75,000/- प्रत्येकी देण्याचे ठरले. असे एकुण या अपघातापोटी 73,05,000/- रूपये देण्याचे आदेश सामनेवाला विमा कंपनीला लोकन्यायालयाच्या अधिकृत पॅनलचे अध्यक्ष न्यायमुर्ती श्रीमती. एस. एन. मोरवाले यांनी योग्य ते आदेश पारीत केले. सदरचा न्यायनिवाडा हा एक वर्षाच्या आत झाला याचे समाधान मयतांच्या आश्रीतांना होते. व वारंवार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या नाहीत तसेच एका वर्षाच्या आत समाधान कारक नुकसान भरपाई मिळण्याचे संतोष अर्जदारांना झाले.


घरातील कर्ता व्यक्तींचे अचानकपणे मृत्यु झाल्याने भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मिळालेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमेतुन मात करता येईल या भावनेने नुकसान भरपाई रक्कम मे. लोकन्यायालयात समक्ष पक्षकारांना देण्यात आली.


सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी अॅड. हेमंत आर. जाधव, अॅड. सुनिल चव्हाण, यांनी कामकाज पाहीले. तसेच विमा कपंनी तर्फे महाराष्ट्र राज्याचे रॉयल सुदंरम कपंनीने लिगल हेड सरोज कुमार चौधरी व विमा कंपनीचे वकील प्रसाद गोडबोले यांनी बाजु मांडली.


जळगाव


दिनांक 11/11/2023


अॅड. महेंद्र सोमा चौधरी, जळगाव

Post a Comment

0 Comments