Type Here to Get Search Results !

लोहारा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न!!आमदार;गिरीश महाजन यांची सात वेळा आमदारपदी निवडीबद्दल उपक्रम ; शिबीर दरम्यान केली१५७ रूग्णांची तपासणी.


दिशा लाईव्ह न्यूज  -:-  लोहारा ता.पाचोरा येथे  महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक  म्हणून सुपरिचित असलेले जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना.गिरीश महाजन यांची सलग सात वेळाजामनेर तालुका  आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक ४ डिसेंबरला पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख.) यांनी दिली. 

या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी,नाक,कान,घसा, मोतीबिंदू तसेच तिरडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुतखडा, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.

रुग्णांना मोफत मेडिकल गोळ्या औषधी देण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर काळू चौधरी,  विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल,अशोक बोरसे, शिवराम भडके,शैलेश पालिवाल, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शरद अण्णा सोनार,विकासोचे संचालक सुनील क्षीरसागर,  सामाजिक कार्यकर्ते हितेश पालीवाल, ग्रामसेवक गजानन काळे, ग्रामपंचायत  सदस्य अमृत चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश चौधरी, ईश्वर  आनंदा देशमुख, आबा चौधरी, शांताराम चौधरी,राहुल कटारिया,संजय चौधरी ,जेष्ठ नागरीक संघाचे भास्कर अंबिकार,,विजय चौधरी ,माजी सरपंच रमेश विठ्ठल चौधरी, म्हसास येथील किसन पाटील, डॉ. सुभाष घोंगडे,डॉ विकास पालीवाल,अण्णा चौधरी, विशाल ठोसर,उमेश देशमुख, शरद कोळी, हितेश पालीवाल, गोपाल पाटील, अमोल पाटील, विशाल खाटीक, गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते,

 गोदावरी फाउंडेशन व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय डॉक्टर,परिचारक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments