Type Here to Get Search Results !

दिशा लाईव्ह न्यूजचा दणक्याने महावितरणची झोप उडाली!! लोहारा येथील धोकादायक असलेला विद्युत पोलचे काम सुरू!!---तर अनधिकृत वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई!!-ठिकठिकाणी धाडसूत्र सुरू..संबंधितांवर होणार कारवाई.

 


दिशा लाईव्ह न्यूज -:-   गेल्या 15 दिवसांपासून लोहारा आणि परिसरात रोजच  सकाळी विद्युत पुरवठा हा जवळपास 4 वाजेपासून बंद व्हायचा आणि 5 ते 7 तासानंतर चालू व्हायचा.. या त्रासाला बरेच महावितरणचे ग्राहक कंटाळले होते. त्याचा परिणाम हा दैनंदिन जीवनावर व्हायचा.

लोहारा आणि परिसरात अनेक दिवसांपासून वीजचोरीचे प्रमाणात खूपच वाढ झाली आहे. हिटर,शेगडी आणि विना कनेक्शन  विद्युत चोरी होत असल्याने त्याचा परिणाम हा  म्हणून लाईन ट्रिक होऊन बंद व्हायची.. हा रोजचाच प्रकार झाल्याने शेतकरी वर्गातही तीव्र नाराजी दिसून येत आहे. तसेच व्यवसायिक पण कमालीचे नाराज आहे.


या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रीतील अववल न्यूज चॅनल दिशा लाईव्ह न्यूजने त्वरित या प्रकरणावर प्रकाशझोत टाकून दि.10 रोजी या संबंधी  सडेतोड बातमी प्रकाशित करून हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला.

तसेच लोहारा येथील पिरोबा (शहावदल शहा अली बाबा ) यांच्या दर्ग्यासमोर असलेल्या जीर्ण पोल विषयी सचित्र वृत्त प्रकाशीत केले होते.त्या जीर्ण पोलचे काम ही आजच झाले आहे.



पाचोरा येथील संबंधित अधिकारी यांनी त्वरित या वृत्ताची दखल घेऊन आज दि.11 रोजी  संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ठिक ठिकाणी आज धाडसूत्र राबवून अनेक अनधिकृत विजकनेक्शन बंद केले, तसेच साहित्य ही जप्त केले

यावेळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मिळून ही कार्यवाई करण्यात आली आहे..

त्यांच्या या कारवाईने अनेक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे..भविष्यात ही अशीच कारवाई चालू ठेवावी अशी सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे.


तसेच सदर वृत्ताची दखल घेतल्याबद्दल दिशा लाईव्ह न्यूज महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी, व कर्मचारी यांचे नक्कीच आभार मानायला विसरणार नाही.

या पुढे ही वीजचोरी करणार्यावर धडक कारवाई करण्यात येईल.असे महावितरण पाचोरा येथील उपकार्यकरी अधिकारी श्री खोडपे सर यांनी संगितले.

या कारवाई मुळे नक्कीच अनधिकृत वीजचोरी करणार्याचे कारवाईच्या भीतीने  धाबे दणाणले आहे.


आवाहन---- वीजचोरी मुळे रोजचं सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होत असते. विशेषतः शेतकऱ्यांना याचा फटका असत आहे. बऱ्याच वेळा रात्री 12-55 मिनिटांनी शेतशिवारात वीजपुरवठा सुरू होती. मात्र हिटर-शेगडीचा अति वापराने त्याचा परिणाम थेट लिडशेटिंग होतो. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जेमतेम 3 तास मिळतात.  ज्यांच्याकडे  अनधिकृत कनेक्शन, हिटर,शेगडी असेन त्यांनी ती त्वरित काढून घेण्यात यावी.अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल! असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पस्ट सांगितले.

**********************************************


लोहारा,ता.पाचोरा  येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळी एलटी पोल रिप्लेस  करतांना महावितरणचे कर्मचारी आणि  ग्रामस्थ.

Post a Comment

0 Comments