दिशा लाईव्ह न्यूज -:- महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत 86 किलो वजनी गटात केदांत विजय चौधरी ,लोहारा, ता.पाचोरा (प्रथम वर्ष, कृषी अभियांत्रिकी) याने शानदार कामगिरी करत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
आतापर्यंत केदान्त चौधरी याने अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
केदांत विजय चौधरी हे श्री खंडेराव भक्त व दिवंगत दादाश्री लोटू नारायण चौधरी यांचे नातू असून, येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विजय लोटु चौधरी यांचे सुपुत्र आहेत.त्यांचे मूळ गाव लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव आहे.
या यशाबद्दल केदांत चौधरीचे विद्यापीठाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. त्याची ही कामगिरी अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments