दिशा लाईव्ह न्यूज -:- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने गेल्या सात दिवसापासून गुरुचरित्र पारायण वाचन तसेच सेवा सेवेकरी करीत होते. व या पारायण ची सांगता आज सोमवारी दुपारी श्री स्वामी समर्थांच्या महा आरती नंतर करण्यात आली. यानिमित्ताने स्वामी चरित्र हवन देखील करण्यात आले. यावेळेस बहुसंख्येने सेवेकरी उपस्थित होते.
तसेच पिंपळगाव परीसरातील पत्रकार बंधूंना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमा दर्शनाचा, व महाआरती चा लाभ मिळाला.
यावेळी पत्रकारांचा सेवेकर्यांच्या मार्फत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे नवीन वर्षाची दिनदर्शिका (कडे )वडगाव येथील सेवेकरी श्री.संदीप पाटील माऊली यांच्यामार्फत भेट देण्यात आली . आरती नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
यावेळेस सेवा केंद्रातील सेवेकरी गजानन तेली, गरुड आप्पा, प्रशांत गरुड,सुनील गरुड, अतुल मालकर, सुरेश बापू गरुड, स्वानंद बडगुजर, यांनी अनमोल सहकार्य केले .
सर्व सेवेकरी व पत्रकार बांधवांना संदीप पाटील माऊली यांनी स्वामींच्या अध्यात्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक घटकांवर मार्गदर्शन केले.अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
Post a Comment
0 Comments