Type Here to Get Search Results !

ना पाटी.... ना पुस्तक,.....आम्ही असतो रात्रंदिवस पालकांसोबत!!! मेंढपाळ कुटुंबाचे मुले आजही शिक्षणापासून वंचित!!. शोध बातमीचा---शोधक पत्रकारिता!!-दिशा लाईव्ह न्यूज.


                  सुनील लोहार ...-:-कुऱ्हाड प्रतिनिधी .

 दिशा लाईव्ह न्यूज -:-    कुऱ्हाड ता.पाचोरा_सद्या कपाशी पिके काढणीचा हंगाम सुरू असून ,रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.दसरा दिवाळी नंतर नांदगाव जिल्हा नाशिक परिसरातील असंख्य  मेंढपाळ धनगर बांधव आपल्या मुलाबालांसह जळगाव जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी रवाना होत असतात.

या समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या पालनाचा असून मेंढ्या चारण्यासाठी रिकाम्या झालेल्या कपाशीच्या शेतात मेंढ्या चारून ,सबंधित शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीचे पीक मोफत उपटून ,तसेच शेतात रात्र न दोन रात्र मेंढ्यांचे खत पडून यामुळे पिकांच्या  उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचा फायदा होतो  .


आपल्या संपूर्ण परिवारासह दाखल झालेले एक मेंढपाळ रवी यशराज तोरे व त्यांचे शालक हे कुटुंबासह कुऱ्हाड परिसरात आपल्या तीनशे ते चारशे मेंढ्या ,दोन बैलगाडी सह दाखल झालेले आहे ,या दोन कुटुंबांना पाच अपत्य असून तीन मुली ह्या अनुक्रमे दहा बारा वर्षांच्या तसेच मुले पाच , सात वर्ष वयाची आहेत.पोटासाठी कुटुंबासह यांना रानोरानी फिरावे लागत असल्याने त्यांच्या मुलांना शाळा काय असते हे देखील माहीत नाही.

सुमारे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर त्यांना  वर्षातील आठ महिने बाहेर आपल्या मुला बाळांसह उदरनिर्वाहासाठी रानोरानी भटकावे  लागत असल्याने मुले ही परंपरागत अडाणी असतात.या मुलांना मोठे झाल्यानंतर त्यांना फक्त व्यावहारिक ज्ञान माहिती असते,त्यांना बाहेरील जगाशी काहीही संबंध येत नाही.आपल्या मुलांसह रानोरणी पावसात, विजांचा कडकडाट,वादळ वाऱ्यात ,थंडीत  तसेच कडाक्याच्या उन्हात , वाडा एखाद्या जंगला शेजारी असल्यास वन्यप्राण्यांचा धाक आदी गोष्टीं पासून आपल्या मुलाबाळांना सांभाळावे लागते. 


मुले आई-वडिलांसोबत असल्याने त्यांना शाळेत पाटी दप्तर,अक्षरांची  ओळख नसल्याने त्यांना फक्त आणि फक्त  वाड्या वस्त्यांवर मेंढरे चारणे एवढेच माहीत असते.आणि या शाळा योग्य मुलांची जणू शाळा ही मेंढरांच्या कळपात भरलेली असते. त्यामुळे त्यांना बाहेरील ज्ञानाशी काही घेणे नसते.

अशी अनेक मेंढपाळ कुटुंबे या परिसरात आलेली आहे.यातील सर्व शाळा योग्य मुले , मुली मेंढ्या चारण्याचे काम करून आई वडिलांना या कामात हातभार लावीत असतात .यामुळे भविष्यात या मुलांना अडाणी व अशिक्षित म्हणून तसेच  शाळाबाह्य मुले म्हणून त्यांच्या गावी ओळखले जातात. आई वडिलांनी या मुलांच्या भविष्याच्या बाबतीत आता जागरूक होणे गरजेचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले.

दिशा लाईव्ह न्यूज.
                    संपादक-:- दिनेश चौधरी, लोहारा.
                           

9309918930    9881028027






Post a Comment

0 Comments