दिशा लाईव्ह न्यूज (भारत पाटील, म्हसास ) पाचोरा येथील मुख्यमंत्री युवा कार्य सहायक प्रशिक्षणार्थीचे विविध मागण्यांसंदर्भात १६ डिसेंबर रोजी पाचोरा प्रांताधिकारी,तहशिलदार,व आमदार यांना निवेदन देण्यात आले,
महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली,व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठराविक कालावधीत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे, आजपावेतो प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षणार्थींना शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे,
या योजनेचा माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळुन समजून घेण्याची संधी मिळाली,या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक पात्रता नुसार कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे,कारण सहा महिने प्रशिक्षण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम असतील त्यांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी/रोजगाराची मिळेल,
त्यामुळे प्रशिक्षणार्थींच्या संदर्भात शासनाने तसा निर्णय घेण्यासंबधी आस्थापना यांना आदेशीत करून न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करावी म्हणजे प्रशिक्षण कालावधीला जोडुन नौकरी किंवा रोजगार देण्याची द्रष्टीने व्यवस्था होईल , या व्यतिरिक्त सदरील योजनेच्या अनुषंगाने खालील मागण्या आहेत - या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींचा सेवेचा कालावधी वाढवून सर्वांना सेवेत सामावून घ्यावे,
प्रशिक्षण कालावधी नंतर शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के इतके मानधन करावे , शासकीय, निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा आहेत त्या आम्हालाही लागु असाव्यात, वेगवेगळ्या परिक्षाच्या माध्यमातून जी नोकरभरती होते,भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थी साठी 10 टक्के राखीव जागा ठेवाव्यात तसेच अंशकालीन करण्याबद्दल विचार करण्यात यावा ,
आपण या योजनेचा हेतू यशस्वीपणे पूर्ण करुन आमच्या भविष्याची दिशा निश्चित करावी, तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या वरील सर्व मागण्या मंजूर करून सर्व प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देवून सहकार्य करावे महाराष्ट्राला अधिक विकसित व गतिशील बनवण्यासाठी आम्हाला योगदान देण्याची संधी द्यावी,अशा आशयाचे निवेदन पाचोरा येथील प्रशिक्षणार्थीं यांनी प्रांत साहेब यांना देण्यात आले.
Post a Comment
0 Comments