दिशा लाईव्ह न्यूज -:-- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित लोहारा येथील डॉ.जे. जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी साहित्याची मराठी साहित्याची मेजवानी या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध कवी ,गझलकार, ललित लेखक प्राध्यापक वा. ना. आंधळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेनगाव येथील आदर्श व्यक्तिमत्त्व व संस्थेचे सहसचिव यु यु पाटील सर होते.
तर प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषी भूषण विश्वासराव पाटील. कैलास चौधरी, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ अ पटेल सर ,माजी कर्तव्यदक्ष मुखध्यापक आर एस परदेशी सर, माने सर , सामाजिक कार्यकर्ते विनायक बापू पाटील, म्हसास येथील प्रकाश भाऊ पाटील, योगेश पाटील ,तसेच रामेश्वर तांडा येथील सरपंच दत्तू भाऊ राठोड ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार , विकासो चेअरमन प्रभाकर काळू चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख तसेच लोहारा येथील अनेक सन्माननीय मंडळी व भगिनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.. ज्ञानसाधना सर्वोदय मंडळाच्या वतीने सुद्धा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला ..उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्त्यांचा परिचय वाय पी वानखेडे सर यांनी करून दिला. त्यानंतर सर्वोदय मंडळाच्या वतीने सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांना देण्यात आले .त्याचे वाचन पी यु खरे सर यांनी केले .
कार्यक्रमाचे व्यक्ते प्राध्यापक वा ना आंधळे यांनी आपल्या व्याख्यानातून कवितेचा जन्म कशाप्रकारे होतो!!कविता कशाप्रकारे मांडता येते? याविषयी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाच्या शिदोरीद्वारे आपल्या ग्रामीण बोली भाषेत मार्गदर्शन केले. तर "आई मला जन्म घेऊ दे" ही कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली .
यावेळेस विद्यार्थ्यांनी प्राध्यापक वा ना आंधळे यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला .यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यु यु पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आंधळे सरांच्या कार्यकर्तृत्वाविषयी गुणगौरव केला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार आर सी जाधव सर यांनी मानले .हा कार्यक्रम ज्ञानसाधना सर्वोदय मंडळाच्या वतीने विद्यालयात आयोजित करण्यात आलेला होता. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सुद्धा त्यांचे आभार मानण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.यु डी शेळके मॅडम व उपमुख्यध्यापक एस व्ही शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
दिशा लाईव्ह न्यूज....सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम ,अचूक,आणि निर्भीड बातम्या मांडणारे एकमेव न्यूज चॅनेल.
9881028027
9309918930
Post a Comment
0 Comments